कर्करोगमुक्त व्यक्तींकरिता केसांच्या वाढी करिता करण्यात येणाऱ्या उपचारांना सौंदर्यप्रसाधन प्रक्रिया म्हणून न पाहता एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याकडे पाहण्याचे डॅाक्टरांचे आवाहन
पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांकरिता कर्करोगाच्या उपचारादरम्यान गळालेल्या केसांची पुन्हा वाढीकरिता क्युआर678 थेरपी अतिशय प्रभावी ठरत आहे. केस गळणे हा केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारांचा एक सामान्य दुष्परिणाम आहे, ज्यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही खालावतो. या व्यक्तींना पुन्हा पुर्ववत दिसण्यासाठी आणि त्यांच्या केसगळतीवर योग्य उपचार म्हणून क्युआर678 या थेरपीला पसंती मिळत आहे. ज्यांना कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळतीचा अनुभव आला आहे त्यांना कोणत्याही नकारात्मक दुष्परिणामांशिवाय त्यांचे केस पुन्हा परत मिळाले आहेत.
डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट आणि एस्थेटिक क्लिनिकमधील स्किन-सर्जन सांगतात की, “संशोधनाने दाखवून दिले आहे की केसांची पुनर्वृद्धी उपचारांमुळे रुग्णांना भावनिक आधारही मिळू शकतो व कर्करोगातून मुक्त झालेल्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. केसांची यशस्वी वाढ केवळ रुग्णाचे हरवलेले केस परत आणत नाही तर त्यांचा आत्मविश्वास परत आणते. कर्करोगानंतरच्या जीवनाशी जुळवून घेणे काहीसे कठीण असू शकते. क्यु आर 678 ही एक दुष्परिणामविरहीत थेरेपा आहे जी निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. यात थेट फॉलिकल्समध्ये पोषक तत्वे इंजेक्ट केली जातात. इतर उपचारांच्या तुलनेत, या उपचारामध्ये सक्रिय घटक आहेत जे सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणे कमी करण्यास मदत करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आहेत. हे उत्पादन टाळूचे पोषण करण्यासाठी आणि केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील प्रदान करते.
कॅन्सरमधुन वाचलेल्यांना बरे होण्यासाठी आवश्यक असलेल्या केमो आणि रेडिएशनमुळे केसगळतीचा त्रास होतो एखाद्याची मानसिक आणि भावनिक स्थिती देखील ढासळू शकते. बर्याचदा, केस गळण्याचा भावनिक त्रास पीडितांसाठी कर्करोगाचा शारीरिक परिणामांइतकाच त्रासदायी ठरु शकतो. या कारणास्तव, विमा कंपन्यांनी कव्हरेज प्रदान केले पाहिजे जेणेकरून कर्करोगाच्या रूग्णांना त्यांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करता येईल आणि अशा भावनिक आणि आर्थिक तणावातून गेल्यानंतर त्यांना पुन्हा जीवनाचा आनंद घेता येईल.
केस गळणे ही त्यांच्या कर्करोगाच्या उपचारातील एक मोठा दुष्परिणाम आहे. केस नसताना नवीन ओळख निर्माण करताना अनेकांना त्रासदायक ठरु शकते. कॅन्सरमधुन वाचलेल्यांसाठी केस पुन्हा वाढवण्याच्या उपचारांचा आरोग्य विमा संरक्षणामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
Tags
पनवेल