पाहाटेचा गजर स्वच्छतेचा,मुखात नामस्मरण हातात झाडू
 काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १ मार्च , डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्यांने व जेष्ठ निरुपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी पुर्तीसोहळा निमित्ताने खोपोली परिसर स्वच्छ करण्यासाठी हजारो श्री सदस्य आणी नागरीक आपल्या हातात झाडू घमेले,फावडे खुरपणे घेवून स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते


. सकाळी ७ वाजता स्वच्छता अभियान ला सुरुवात करण्यात आली.यावेळी शासकीय कार्यालय,पोलीस स्टेशन,फॉरेस्ट ऑफिस, खोपोली बाजार पेठ रस्ता,दवाखाना,शासकीय शाळा,बस स्टॅंड अश्या विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.यावेळी ओला कचरा १० टन, सुका कचरा ३० टन काढण्यात आले रस्ता १८ की.मी ,२१०० श्री सद्स्य ,वहाने अदि स्वच्छता अभियान मध्ये सहभागी होते.यावेळी खोपोली नगर पालीका कर्मचारी अधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. सदस्य या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी ओला सुका कचरा त्याचे वर्गीकरण करण्यात आले. श्री सदस्य यांनां सुरक्षा साधने देण्यात आले.वातावरणात उष्णता जरी असली तरी सुद्धा असला तरी त्यांची तमा न बाळगता श्री सद्स्य स्वच्छता करण्यासाठी हात पुढे सरसावत होते. परिसर स्वच्छ करतांना श्री.सदस्यांच्या चेहर-या वरती एक प्रकारचे समाधान दिसून येत होते.कारण आपण चांगले काम करीत आहेत


.हा परिसर शहर स्वच्छ झाले कि रोगराई पसरणार नाही.यामुळे माणूस निरोगी राहील आणि माणसाला उत्तम आरोग्य राखण्यास मदत होत.असते.अशी शिकवण बैठकीच्या माध्यमातून श्री.सदस्यांना मिळत असते.या विचारांने श्री सदस्यांनी या परिसरातील रस्ता,गल्ली,बस स्थानक या अशा सर्वच ठीकांनी साफ- सफाई करण्यात व्यस्त झाले होते.
थोडे नवीन जरा जुने