पालिकेचा आर्थिक स्रोत असलेले जाहिरात फलक सध्या सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. खारघरमधील उत्सव चौकातील वळणावर लावलेले डिजिटल फलक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून या फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
खारघर परिसरातील रस्त्यावर सध्या मोठ्या संख्येने डिजिटल फलक लावले जात आहे. अशातच खारघरमधील सर्वांत वर्दळीच्या अशा उत्सव चौकात डिजिटल फलक बसवण्यात येत आहेत. त्यामुळे चारही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांना उत्सव चौकासमोरील मेट्रो पुलाखाली लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे चौकातील फलक हटवावे, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे. याबाबत पालिकेच्या परवाना विभागाकडे विचारणा केली असता नागरिकांच्या तक्रारीमुळे हे कामकाज थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले,
Tags
पनवेल