मेट्रोचे काम ९० टक्के पूर्ण
सिडकोचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील पेंधर ते खारघर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तर उर्वरित खारघर - बेलापूर दरम्यानची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्गावर मेट्रोची सेवा सुरू होण्याची शक्यता संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबईत मेट्रोचे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी पेंधर ते बेलापूर या ११ किमीलांबीच्या पहिल्याच मार्गांचे काम दीर्घकाळ रखडले आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील स्थानक क्रमांक ७ ते ११ अर्थात खारघर येथील सेंट्रल पार्क ते पंधर
स्थानकादरम्यानच्या ५, १४ किमी अंतरातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या सिडकोने


यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही या मार्गावर प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी परवानगीही दिली आहे. मात्र, उद्घाटनाचा मुहूर्त
निश्चित होत नसल्याने मागील वर्षभरापासून मेट्रोचा प्रवास रखडला आहे. असे असले तरी उर्वरित म्हणजेच खारघर ते बेलापूर पर्यंतच्या मार्गाचे ९० टक्के
कामे पूर्ण झाले असून, सध्या काही किरकोळ स्वरुपाची कामे सुरू आहेत. दोन तीन महिन्यांत तीसुद्धा होतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.


त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या मागचे दोन टप्प्यात उन उद्घाटन करण्याऐवजी युद्धपातळीवर उर्वरित मार्गांचे काम पूर्ण करून संपूर्ण बेलापूर ते पंधर या
मार्गावर एकाच वेळी मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे.
थोडे नवीन जरा जुने