पनवेल-खोपोली मार्गावर सावरसई येथे मंगळवारी सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास कार आणि स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक संदीप शिर्के (३०) याचा जागीच मृत्यू झाला तर गागोदे गावच्या बस थांब्याजवळ सकाळी ६. ५५ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक मनोज पाटील (३७) याचा जागीच मृत्यू झाला.
एका घटनेत स्कुटी (एमएच ०६/सीएफ३३२६) चालक पनवेलपासून खोपोलीच्या दिशेकडे जात असताना व्हेंटो कार (एमएच ०४ एफआर ९७६३) खोपोलीहून येत होती. सावरसई गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाला. दुसऱ्या घटनेत गागोदे गावच्या बस थांब्याजवळ खोपोलीकडून दुचाकी (एमएच०६/बीझेड८४४३) पनवेलकडून पेणच्या दिशेने जात असताना खोपोलीकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच ०६/बीडब्ल्यू ०५७९) यांच्यात धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ अधिक तपास करीत आहेत.
Tags
पनवेल