गुढीपाडव्या निमित्त वुमेन ऑफ विसडम तर्फे बाईक रॅलीचे आयोजन.उरण दि.19 (विठ्ठल ममताबादे ) हिंदू नववर्ष अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत उरण मध्ये विविध उपक्रम साजरे करून होत असून दि.22 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वा. वूमेन ऑफ विसडम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.


 नववर्षाचे स्वागत बाईक रॅलीने होणार असून सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांच्या पुढाकाराने बाईक रॅली आयोजित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्त्या संगीता प्रशांत पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत.सदर बाईक रॅली फक्त महिलांसाठीच असून या बाईक रॅलीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी खालील नंबर वर नाव नोंदणी करावे.


सारिका सागर पाटील -9664979696 
थोडे नवीन जरा जुने