ट्रू-व्हॅल्यू मारुती सुझुकी शोरूम मध्ये चोरी

पनवेल दि.१९ (वार्ताहर) : पनवेल जवळील पळस्पे येथे असलेल्या ट्रू-व्हॅल्यू मारुती सुझुकी शोरूम मध्ये अज्ञात चोरट्याने चोरी करून ४ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


 ट्रू-व्हॅल्यू मारुती सुझुकी शोरूम मध्ये बंद झाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून शोरूममध्ये असलेल्या दालनात आतील रूममध्ये ठेवलेले ४ लाख रुपये रक्कम घेऊन तो पसार झाला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने