सराईत सोनसाखळी चोरांना खारघर पोलीसांकडुन अटक; जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत


पनवेल दि.२२ (संजय कदम) : खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून पसार होणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना अखेरीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा मिळून जवळपास ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे
फिर्यादी रोशनी झेंडे ह्या वडील व बहिणीसह खारघर सेक्टर १२ येथील बँक ऑफ बडोदा याचे समोरील रोडवरुन पायी चालत जात असताना समोरुन आलेल्या मोटार सायकलवरील वरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळयातील ७५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरी चोरी करून पळून गेले. तसेच अश्याच प्रकारे कुमुदीनी अहिरे ह्या खारघर सेक्टर ४ येथील रेलविहार येथे मैत्रिणीसोबत बोलत असताना मागील बाजुने अनोळखी इसमाने त्यांच्या गळयातील पावणेदोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरी चोरी करून पुढे मोटार सायकलवर उभा असलेले साथीदारा सोबत पळुन गेला होता. या दोन्ही घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आले होती. त्यानुसार वपोनि राजीव शेजवळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक दाभोळकर, सपोनिरी मानसिंग पाटील, पोउपनि शिरीष यादव व पोहवा फिरोज आगा, पोहवा प्रशांत जाधव, पोना मच्छिन्द्र खेडकर, पोना सचिन सुर्यवंशी, पोका लवकुश शिंगाडे, पोकों सचिन डाके, पोकों राज वाठोरे, मपोकों दिपा चव्हाण आदींचे विशेष पथक नेमले होते. या पथकाने सदर गुन्हयात तात्रिक तपासाचे आधारे एक पुरूष आरोपी (वय ५५ वर्षे, रा. मंगलनगर आबिवली ता. कल्याण) यास अबिवली येथून ताब्यात घेतले. तसेच अश्याचप्रकांरे दुसऱ्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खारघर परिसरातील केलेल्या गुह्यांची कबुली दिली. त्याचप्रमाणे एनआरआय सागरी पोलीस ठाणे, नेरुळ पोलीस ठाणे व वाशी पोलीस ठाणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी सदर गुन्हे केल्याचे अधिक तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्यांचेकडून १५ तोळे वजनाचे ४ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण ४ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. थोडे नवीन जरा जुने