न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी संजीव धुमाळ
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात अतिशय महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असून नवीन येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांकडून उरणच्या समस्यांना न्याय मिळेल का ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.अधिकारी येतात जातात मात्र उरणच्या समस्या आहे तशाच राहतात. आज उरण मध्ये अनेक समस्या आहेत मात्र त्या सुटत नसल्याने जनतेत प्रचंड नाराजी सुद्धा आहे. मात्र नवीन येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात मात्र हे अपेक्षा कधीच पूर्ण होत नसल्याने उरण मध्ये येणाऱ्या नवीन शासकीय अधिकाऱ्यां बाबत नागरिकांमध्ये उत्सुकता बघायला मिळत नाही. नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांचा बदलत चालला आहे. लाखो करोडो रुपये देऊन शासकीय अधिकारी उरण मध्ये येतात. उरण मध्ये जॉईन होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना वरच्या लेव्हलला लाखो रुपये मोजावे लागतात. आणि हे अधिकारी लाखो रुपये देऊन उरण मध्ये येतात. व ते त्यांच्या कामातच व्यस्त असतात.अशी चर्चा उरण मध्ये सर्वत्र सुरु आहे.जनतेच्या प्रश्नांकडे या नवीन शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येते.त्यामुळे नवीन येणारे अधिकारी उरणचे प्रश्न सोडवतील का असा सवाल जनतेने उपस्थित केला आहे. उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संजीव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभारही स्वीकारला आहे. उरणमधील शासकीय अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू आहे. त्यामध्ये उरण पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील पाटील, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर भटे यानंतर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांचीही उरणहून बदली झाली आहे. अशा प्रकारे काही दिवसांच्या अंतराने प्रथमच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांची बदली झाल्याने त्या जागी संजीव धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने