उरण-पनवेल मार्ग सोमवारपासून दुरुस्तीसाठी बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन.
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात. मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी सोमवार (२० मार्च) पासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 


सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण - पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानक व आनंदी हॉटेलजवळील दोन साकव (मोऱ्या) नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार (२० मार्च) पासून उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका (राघोबा मंदिर ) हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.प्रवाशी वर्गांचे प्रवासात होणारे हाल, जनतेच्या मागणीचा विचार करून व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे समजते.थोडे नवीन जरा जुने