चहा पिण्यास गेलेला इसम झाला बेपत्तापनवेल दि . ०१ ( संजय कदम ) : चहा पिऊन येतो असे चालकाला सांगून गेलेला क्लिनर अद्याप न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


 
                तालुक्यातील भोकरपाडा सहारा कांदा गोडाऊन येथे एका ट्रक वर असलेला क्लिनर राजेश आसाराम खन्ना ( वय ३० ), उंची ५ फूट ,रंग गोरा ,बांधा मध्यम , दाढी बारीक , केस बारीक ,चेहरा गोल , नाक सरळ असून उजव्या हातावर राजेश असे नाव गोंदलेले, अंगात पिवळ्या रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पँट व पायात चप्पल आहे . त्याला हिंदी भाषा अवगत आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फो . ०२२-२७४५२४४४ किंवा पो. ना. दाणे यांच्याशी सपंर्क साधावा . थोडे नवीन जरा जुने