करंजाडे ग्रामपंचायतीत मागासवर्गीय वयोवृध्द महिलेची फसवणूक.










करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न.


ताराबाई लोंढे यांची तक्रार.


ताराबाई लोंढे या वयोवृद्ध मागासवर्गीय महिलेवर अन्याय.




मालमत्ता हडप करणाऱ्या व अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देणाऱ्या सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची ताराबाई लोंढे यांची प्रशासनाकडे मागणी.




उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )लोकसभा विधानसभा यांच्याप्रमाणेच ग्रामपंचायतीचा कारभार हा संविधानिक पद्धतीनेच चालावा.यासाठी 73 वी घटना दुरुस्ती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात करण्यात आली.त्याचा भाग म्हणून ग्रामीण भागातील घरांची नोंदणी पती पत्नी यांच्या संयुक्त नावे करण्याबाबत आदेश महाराष्ट्र शासनाने 20 नोव्हेंबर 2003 साली प्रसिद्ध केले आहेत.परंतु पनवेल जवळच्या करंजाडे ग्रामपंचायतीत आजही सर्व पदाधिकारी महिला विरोधी असल्याचे तक्रारी वरून दिसून येते .


आपली फसवणूक झाल्याची तक्रार अनुसुचित जातीच्या महिला श्रीमती ताराबाई रामचंद्र लोंढे वय 83 वर्षे.करंजाडे बौद्ध वाडा ता पनवेल यांनी सर्व सरकारी विभागाकडे केली आहे.सदरील जागेवर बाजारमूल्य हे सहा कोटी रुपये आहे.



माझ्या मालकीच्या जागेत माझी परवानगी न घेता जबरदस्तीने कब्जा करणे अतिक्रमण करणे यात सहभागी तत्कालीन ग्रामसेवक सरपंच तसेच इतर सहयोगी सदस्य यांच्याविरोधात भा द कलम 420 आणि अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशी सरकार कडे मागणी आहे.तसेच सदरील जागेत अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम करीत असताना नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची आणि माझी परवानगी नसताना हे बांधकाम पाडण्याची विनंती सिडको विभागाकडे व ग्रामपंचायत यांनाही केली आहे.

मा सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढणे बाबत पूनम राम विरुद्ध मोती राव यांचा निकाल दि 29 / 01/2019 हा संदर्भासाठी दिला आहे.
माझ्या मालकीची जमीन हस्तांतरण करताना भारतीय नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 17 मधील तरतुदीप्रमाणे स्थावर मालमत्तेची किंमत रुपये 100 /- वा जास्त असल्यास दस्तऐवज नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणी न करता दस्त हस्तानतर पुरावा होऊ शकत नाही.करंजाडे ग्राम पंचायतने असा कोणताही दस्त नसताना माझी मालमत्ता दुसऱ्याच्या नावे करून माझी मोठी फसवणूक केली आहे.पट्टीयोग्य मूल्य व कर निर्धारनेच्या वेळी काही महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायत हस्तांतरणाचा पुरावा म्हणून न नोंदलेलेले दस्तऐवज ग्राह्य पुरावा धरतात आणि कर आकारणी अवैध हस्तांतरीत व्यक्तीच्या नावे करतात ही मोठी फसवणूक आहे.


तुळशीराम मारुती लोंढे यांच्या नावे माझी मालमत्ता करण्याचा ग्राम पंचायत ठराव वरील कायद्याने अनधिकृत ठरतो. मुळ कागदावर खाडाखोड पाहता माझी मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देणाऱ्या आजी माजी सरपंच ग्रामसेवक पदाधिकारी यांच्याविरोधात गुन्हे नोंदवून एक मागासवर्गीय महिला म्हणून मला न्याय मिळावा अशी विनंती श्रीमती ताराबाई रामचंद्र लोंढे यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहारा द्वारे केली आहे.


थोडे नवीन जरा जुने