खारघर मृत्यु: पोस्टमार्टममध्ये सत्य आलं समोर





खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने श्री सदस्यांचे झाल्याचे म्हटले जात होते. मात्र त्यांनंतर अनेक व्हिडिओ व्हायरल होऊन चेंगराचेंगरी झाल्याचे दिसून आले. त्यावर सर्व स्थरांतून टीका होत आहे. मात्र आता या सर्व मृतदेहांचे पोस्ट मार्टम पार पडले असून त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट झाले
आहे 



भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमावेळी 42 अंश तापमान होतं, अशा स्थितीत मैदानावर पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची कोणतीही सोय नसल्यानं या 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. सरकार आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे 14 जणांना नाहक प्राण गमवावे लागल्यानं, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येतेय. या घटनेतील मृतांचा आकडा जास्त असून तो लपवला जात असल्याचा आरोपही करण्यात येतोय... अशा स्थितीत हे मृत्यू नेमके कशामुळे झाले, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मृतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यू कशामुळे झालेत हे समोर आलंय.






14 जणांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले?

या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांपैकी 12 जणांनी मृत्यूपूर्वी 6 ते 7 तास काहीही खाल्लं.




नव्हतं, असं समोर आलं आहे. इतर 2 जणांनी काही खाल्लं होतं की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मृत्युमुखी पडलेल्यातील अनेकांना आधीपासूनच व्याधी असल्याचं समोर, हायपर टेन्शन, डायबिटीस, ह्रघरोग असल्याचं समोर सहव्याधीचा परिणाम अधिक झाला. वेळेवर अन्न, पाणी न मिळाल्यानं आणि उन्हामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. उन्हामध्ये बसलेल्यांना पाण्यासह सावलचीही गरज होती... तपासणीसाठी आदल्या दिवशी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही उन्हाचा त्रास झाला होता, त्यांनी ही माहिती वरिष्ठांपासून लपवली. कार्यक्रमात असलेले पाणी लोकांपर्यंत पोहचलं नाही, उन्हात बसलेल्यांना मोठा फटका बसला. अन्न आणण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र अनेकांनी सोबत अन्न आणलं नव्हतं. प्रशासन यात कुणाला जबाबदार धरणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ढिसाळ नियोजनामुळे 14 जणांचे प्राण गेले..


थोडे नवीन जरा जुने