पोलारीस कंपनी कामगारांचे 3 मार्च रोजी गेट बंद आंदोलन


 उरण दि.1 ( विठ्ठल ममताबादे)उरण तालुक्यातील भेंडखळ येथील पोलारिस लॉजिस्टिक पार्क(सी डब्लू सी )कंपनीने 502 कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे रायगड श्रमिक संघटना तसेच न्यू मेरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सी डब्लू सी लॉजिस्टिक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून 502 कामगारांनी सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 पासून साखळी उपोषण सुरु केले आहे.


 मात्र कंपनी प्रशासनाने अजूनही कोणत्याही मागण्या पूर्ण न केल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सर्वच राजकीय पक्षाचा व ग्रामपंचायतचा या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा असून कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य ते प्रतिसाद मिळत नसल्याने 502 कामगारांनी शुक्रवार दि 3 मार्च 2023 रोजी पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्लू सी )कंपनीचा गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


थोडे नवीन जरा जुने