दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे स्वागत.
पनवेल / प्रतिनिधी
दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहे. करोना महामारीमुळे अध्ययन प्रक्रियेसोबत परीक्षा पद्धतीदेखील प्रभावित झालेली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रथमच पूर्वीप्रमाणे परीक्षांचे आयोजन केलेले आहे.परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांवर येणारा तणाव लक्षात घेता, त्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे पनवेल येथील विठोबा खंडाप्पा हायस्कुल याठिकाणी परीक्षा देण्यास बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेतर्फे गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचारी व बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचारी यांना देखील गुलाबपुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सदस्य मनोहर पाटील, राजपाल शेगोकार व मच्छिन्द्र पाटील आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने