महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या महिला क्रिकेट स्पर्धेत सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती
महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या महिला क्रिकेट स्पर्धेत सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती 
 माझ्या नवऱ्याची बायको फेम वर्षा पडवळ, स्वराज्य रक्षक संभाजी फेम सचिन पाडळकर राहणार उपस्थित
 पनवेल / प्रतिनिधी 
          महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड येथे महिलांसाठी झाशीची राणी चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिला पोलीस -डॉक्टर -पत्रकार -वकील-शिक्षिका-नगरसेविका व अन्य क्षेत्रातील महिला यांच्यासाठी अंडर आर्म क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे तसेच आजपर्यंत ३५ ते ४० मराठी हिंदी मालिकांमधून वठवणारे तसेच सध्या चालू असलेली स्वाभिमान आणि जय जय स्वामी समर्थ ,श्री गुरुदेव दत्त ,बाळू मामाच्या नावानं चांगभलं, विठू माउली अश्या पौराणिक व स्वराज्य रक्षक संभाजी, जिजामाता ,जय भवानी जय शिवाजी अशा ऐतिहासिक मालिका तसेच तुला पाहते रे , माझ्या नवऱ्याची बायको ,सहकुटुंब सहपरिवार ,देवाशप्पथ ,देव पावला ,देव माणूस ,गोठ , भाग्यरेषा , अश्या कौटुंबिक मालिका मधून काम करणारे तसेच दिवंगत श्री विक्रम गोखले यांच्या बरोबर आत्ताच त्याच्या शेवटच्या चित्रपटात काम व " सुर लागू दे " यात मध्यवर्ती भूमिका करणारे सिनेअभिनेते सचिन पाडळकर व येऊ कशी तशी मी नांदायला (झी मराठी), माझ्या नवर्याची बायको (झी मराठी), रंग माझा वेगळा (स्टार प्रवाह), देव पावला (फक्त मराठी), ज्ञानेश्वर माउली ( सोनी मराठी ), सुखी माणसाचा सदरा (कलर्स मराठी) या मालिकेत काम करणाऱ्या सिनेअभिनेत्री वर्षा पडवळ या उपस्थित राहणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने