वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यूवाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू 
पनवेल दि.३१ (वार्ताहर) : मोटरसायकलवरून घरी जात असताना वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी असलेल्या इसमाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.              प्रदीप साळवी (वय ४२) असे या मयत इसमाचे नाव असून ते खारघरमधील स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये पत्नी व दोन मुलांसह राहत होते. प्रदीप यांनी स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये करुणा एंटरप्रायजेस या नावाने रिअल इस्टेटचे कार्यालय सुरू केले होते. त्यासाठीचे बॅनर बनवण्यासाठी साळवी पत्नीसह खारघर सेक्टर- ३५ मध्ये गेले होते. या ठिकाणी जात असताना त्यांचा वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता.


थोडे नवीन जरा जुने