पनवेल दि.३१ (वार्ताहर) : कळंबोलीतील रोडपाली सेक्टर- १७ मधील एका फ्लॅटवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतले आहे.
कळंबोलीतील रोडपाली सेक्टर- १७ मधील शगून रेसिडेन्सी इमारतीत ही महिला घरातून वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी बनावट ग्राहकाला पाठवले होते. या वेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केल्यानंतर काही वेळातच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या फ्लॅटवर छापा मारला होता.
Tags
पनवेल