नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस तर्फे सत्कार. 

उरण दि. 4 (विठ्ठल ममताबादे) दिनांक 4 मार्च 2023 रोजी उरण शहरातील काँग्रेस कार्यालयात विविध विषया संदर्भात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता उरण शहर व उरण तालुका काँग्रेस तर्फे आयोजित केलेल्या या बैठकीत उरण शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. आर. के.म्हात्रे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली . त्यानंतर हात से हात जोडे या उपक्रम संदर्भात सुचना देण्यात आल्या. कसबा (पुणे) मतदार संघात विजयी झालेले उमेदवार रविंद्र धनगेकर यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची विविध पदावर नेमणूक झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.मिलिंद पाडगावकर यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी, मार्तंड नाखवा यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी,कमळाकर घरत यांची सेवा दल रायगड जिल्हाध्यक्ष पदी, अखलाक शिलोत्री यांची अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने या सर्वांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, संध्या ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष महिला, किरीट पाटील -इंटक रायगड जिल्हा अध्यक्ष, सुनील काठे -तालुका उपाध्यक्ष, गोपीनाथ मांडेलकर -उरण तालुका सेवादल अध्यक्ष,जयवंती गोंधळी उरण तालुका महिला सेवादल अध्यक्ष,अफशा मुकरी महिला शहर अध्यक्ष,चंदा मेवाती -शहर उपाध्यक्ष,अमरीन मुकरी -अल्पसंख्यांक महिला महाराष्ट्र प्रदेश सदस्य,महिला अध्यक्ष रेखा घरत,गुफरान तुंगेकर -शहर उपाध्यक्ष,अकबर नंदाफ -शहर उपाध्यक्ष,प्रीती पाटील -चाणजे विभाग अध्यक्ष,शैलेश तामगाडगे -वार्ड अध्यक्ष,जयवंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने