आत्करगाव येथे महानोंदणी अभियान शिबीर संपन्न








काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ५ मार्च, खालापूर तालुक्यातील ग्रामीण आत्करगाव गावात माजी सरपंच कै.कृष्णा तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ महानोंदणी अभियान शिबीर संपन्न झाल्याने या शिबिरात आत्करगाव परिसरात बहुतांश नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या योजनांचे कार्ड काढून घेतल्याचे पाहायला मिळाले असून हा महा नोंदणी अभियान शिबीर तातुराम पाटील, शिवाजी पाटील, अनंत निरगुळकर, विलास मते, चंद्रकांत मते, विठ्ठल देशमुख, मोहन पाटील, वसंत पाटील, चंद्रकांत देशमुख, समीर देशमुख, नितेश गायकवाड, यांच्या पुढाकारातून पार पडल्याने परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.



                 ग्रामीण भागातील बहुतेक नागरिकांना अपुऱ्या माहिती व कागदपत्रामुळे शासनाच्या काही योजनांचा लाभ घेता येत नसल्याने ग्रामीण भागामधील नागरिकांमध्ये उदासीनता पाहायला मिळत असता शासनाच्या योजना लाभ मिळावा व योजनांसाठी लागणारी कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावी या हेतूने आत्करगाव येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आत्करगाव येथे संदीप पाटील यांच्या कार्यालयात महानोंदणी अभियान शिबीर आयोजन करण्यात आले.


                तर हा शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रसाद शिंदे, गणेश पाटील, शशिकांत लाड, पप्पू वाघमारे, राजेंद्र वाघुळकर, सुधीर पाटील, हरी वाघमारे, सुनील मोरे, नितीन भोईर, वासुदेव धुमाळ, दत्ता वाघमारे, नितेश गायकवाड, सुभाष पाटील, संदीप चोंणकर, रवी वाघमारे, मनोज देवकर, आनंद धारवे, लक्ष्मण वाघमारे, निलेश पाटील, संतोष पाटील आदींनी मेहनत घेत शिबीर यशस्वी पार पडला.






थोडे नवीन जरा जुने