खारघर वसाहती मधील कायदा व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी विशेष उपाययोजना करणार- वपोनि राजीव शेजवळपनवेल दि.१२ (संजय कदम): खारघर वसाहती मधील कायदा व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या तर्फे केलेल्या सत्काराला उत्तर देताना केले.


खारघर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांचे शिवसेना खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला. या वेळी शिवसेना पनवेल तालुका उप महानगर समन्वयक संजय शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत देवरुखकर, शिवसेना विभाग संघटक संजय कानडे ,शिवसेना शाखाप्रमुख सेक्टर 5 आनंद वावळ , शिवसेना शाखाप्रमुख सेक्टर 8 जाधव आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वोपोनि राजीव शेजवळ यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रार दारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार तसेच महिलानांच्या तक्रारींसाठी महिला सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी निसंकोचपणे येऊन आपली तक्रार द्यावी तसेच वाढत्या गुन्हेगारीचे बिमोड करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.थोडे नवीन जरा जुने