अनोळखी रिक्षा चालकाने केली प्रवाश्याला मारहाण







अनोळखी रिक्षा चालकाने केली प्रवाश्याला मारहाण
पनवेल दि.१२ (वार्ताहर): रिक्षा भाड्याचे देवाण घेवाणीवरून अनोळखी रिक्षा चालकाने शिवीगाळ करून प्रवाशाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून निघून गेल्याची घटना पनवेल जवळील उसर्ली खुर्द येथे घडली आहे.


शशिकांत शेळके (वय ५०) यांनी पनवेल स्टेशन येथून रिक्षा करून ती घेऊन उसर्ली खुर्द येथे चालले असताना त्यांची रिक्षा चालकाबरोबर भाड्याच्या देवाण घेणावी वरून बोलाचाली झाली. यावेळी सदर रिक्षा चालकाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचून ज्याची किंमत जवळपास २२ हजार रुपये इतकी आहे ती घेऊन निघून गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने