चैत्राची चाहूल लागताच ,वृक्षांनी केली नवसंजीवनी धारण






काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १५ मार्च, सध्या उन्हाचा चटका जाणवायला प्रारंभ झाला असला तरी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृक्षांनी नवसंजीवनी धारण केली आहे. अशा तप्त उन्हात निसर्गाकडून सुरू असलेली रंगीबिरंगी फुलांची धुळवड मनाला गारवा देऊन जात आहे. निसर्गाच्या प्रकोपाने खचलेल्या बळीराजाला जणू जगण्याची नवी उमेद देण्यासाठी हा निसर्ग पुन्हा आपल्या आविष्काराची उधळण करत असल्याचा भास परिसरात ठिकठिकाणी अनुभवायला येत आहे.



     सध्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी संपूर्ण निसर्ग बेचैन झाला आहे. फाल्गुन संपत, पानगळत सरली निसर्गाच्या सानिध्यात नवसंजीवनी पांघरली ... ऋतुराजाची चाहूल, झाडावेलींना लागली... या ओळीचा प्रत्यय या परिसरात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना झाडांना फुटणारी कोवळी पाने मनाला गारवा देऊन जात आहे. 



तप्त उन्हात , रूई, रिठा, कडूलिंब, आंबा,जांभूळ आदी झाडे फुलांनी रंगून गेली आहे. या झाडावरती कोवळी पाने प्रत्येकाचे मन आकर्षिले जात आहे.संपूर्ण रानात जनू कुणी सुवासिक धुनी पेटवल्यासारखे वाटत आहे. अवसान हरलेल्या निसर्गाची ही चैत्राची उधळणबळीराजाला जगण्याची नवी उमेद देऊन जात आहे. ऋतुराजाच्या स्वागतासाठी निसर्ग श्रृंगार वाढवून सज्ज झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे




थोडे नवीन जरा जुने