पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल मधील लॉजिस्टीक कंपनी मधून २८ लाखांचा माल घेऊन टेम्पोचालक फरार झाल्याची घटना आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने टेम्पोचालकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उपेंद्र साळवी यांनी त्यांच्या आयसर कंपनीचा टेम्पो (एमएच ०४ एफपी १६८१) मध्ये पनवेल कोळखे येथील सीसीआय लॉजिस्टीक लिमीटेड कंपनी येथून माल घेऊन येण्याचे काम टेम्पोचालक जितेश कुशवाह याच्याकडे दिले होते.
त्यानुसार आरोपी जितेश कुशवाह याने गाडीमध्ये माल लोड केल्यानंतर ती गाडी वाघोली, पुणे येथे घेवुन न जाता २४ लाख ४२ हजार ८६३ रुपये किमतीचे एचपी कंपनीचे टोनर असलेले ७४३ बॉक्स व ४ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण २८ लाख ४२ हजार ८६३ रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन फरार झाला. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उपेंद्र साळवी यांनी टेम्पोचालक जितेश कुशवाह याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल