पनवेल शहरातून रिक्षासह मोटारसायकलची चोरी


पनवेल दि.१५ (संजय कदम) : पनवेल शहरातून एका रिक्षासह मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   रिक्षाचालक कल्पेश जगे यांनी त्यांच्या मालकीची ६० हजार रूपये किमतीची काळया पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा (एमएच ४६ बीपी ०७५६) हि लाईन आळी येथील श्री दत्त रायगड समोरील रोडवर दिगंबर अपार्टमेंट येथे पार्क करून ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत गॅरेजचालक मुकेश बेदीलाल प्रजापती यांनी शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक शौचालयासमोर ५ हजार रूपये किमतीची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा (एमएच ४३ ए एक्स ४७६६) हि पार्क करून ठेवली होती. मात्र कोणीतरी अज्ञात इसमाने हि मोटारसायकल चोरून नेली आहे. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने