प्रेस नोट


शालय व महाविद्यालयांमध्ये, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळावी-शिवसेना पनवेल यांची आयुक्तांकडे मागणी*

पनवेल महानगरपालिका हद्दीत,अनेक शाळा व महाविद्यालय कार्यरत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या मालकीचे, शाळा किंवा महाविद्यालयांची संख्या कमी आहे . त्याप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळा संख्या कमी असल्याचेहि,आम्हाला निदर्शनास आले आहे.

 असे असताना दिवसेंदिवस खाजगी शाळा व महाविद्यालय मोठ्या संख्येने, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जोमाने कार्यान्वित असून या महाविद्यालयांमध्ये मात्र शिक्षण शुल्क भरमसाठ व खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला ती परवडणारी नाही.

 महानगरपालिकेच्या धोरणानुसार, महानगरपालिकेच्या मालिकेचे शाळा, जागोजागी असणे आणि शिक्षण प्रसार करणे हे अनिवार्य आहे. त्याच अनुषंगाने आपण मालमत्ता करामध्ये याची तरतुदी केली आहे.
  पनवेल महानगरपालिका ही नव्याने स्थापित झाली असून, टप्प्याटप्प्याने शाळा व महाविद्यालयांचे नियोजन व निर्माण अपेक्षित आहे. मात्र तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला खिशाला परवडण्यासारखी शिक्षण केंद्र असणं खूप गरजेचे आहे.

 या बाबत शिवसेना पक्ष पनवेल मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांना प्रत्येक शाळेमध्ये 25% आरक्षण ठेवण्याची सक्ती पनवेल महानगरपालिकांनी करावी याची मागणी करण्याचे निवेदन पनवेल शिवसेना महानगरसंघटक श्री मंगेश रानवडे व युवासेना पनवेल सचिव श्री रोशन पुजारी यांनी महानगरपालिका आयुक्त श्री गणेश देशमुख यांना सादर केले.

तसेच, आरक्षित जागेवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क पनवेल महानगरपालिका ने भरावी याचीही मागणी या निवेदन पत्रात दिले.

हि मागणी पूर्ण झाल्यास सर्वसामान्य जनतेला, शिक्षण घेण्यात मोठी उपलब्धी प्राप्त होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने