उलवे परिसरात विविध धार्मिक विधीसाठी नागरिकांची लूटालुट.








विधी, धार्मिक कार्यक्रमासाठी प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागत असल्याची अनेक तक्रार प्राप्त.

 उलवे परिसरातील धार्मिक विधीसाठी घेण्यात येणाऱ्या अवाजवी फीला बसणार चाप.
उलवे मधील पंडितांनी एकत्र येत कमी खर्चात सेवा देण्याचा केला संकल्प.
सर्वसामान्यांना परवडेल असे विविध धार्मिक विधी, कार्यक्रमाचे ब्राह्मण, पंडित यांचे दर निश्चित करण्याची जनतेतून मागणी.




उरण दि 22(विठ्ठल ममताबादे) आजकाल वास्तुशांती, गृहप्रवेश, लग्न, मुंज, लहान मुलांचे नामकरण, मृत्यु विधी, यज्ञ होम हवन आदी विधी, धार्मिक कार्यक्रम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हिंदू धर्मात या विधिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या विधी शिवाय,धार्मिक कार्यक्रमां शिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे.हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीचा कल या धार्मिक विधी करण्याकडे असतो.गरिब असो वा श्रीमंत प्रत्येक जण आपापल्या परिने धार्मिक विधी करत असतात.धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्वाचे असतात ते ब्राह्मण, पंडित. या ब्राह्मण किंवा पंडिता द्वारे विविध धार्मिक विधी, कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात.अनेक ब्राह्मण कुटुंबे, पंडितांची कुटुंबे धार्मिक विधी करुण आपले अर्थाजन करीत आहेत. धार्मिक विधी करून उपजीविका करीत आहेत. मात्र समाजात काही गोष्टीचा अतिरेक झालेला पहावयास मिळत आहे. त्यापैकीच एक म्हणजे धार्मिक विधी, धार्मिक कार्यक्रमासाठी प्रमाणापेक्षा जास्त मागितलेली फी अर्थातच गुरुदक्षिणा.विविध धार्मिक विधी, धार्मिक उपक्र‌मासाठी सध्या अनेक ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर पैसे मागितले जातात, धार्मिक विधी करणारे व्यक्ती अव्वाच्या सव्वा पैसा घेउन नागरिकांना, भाविक भक्तांना लूटत असल्याचे प्रकार उलवे नोड व उलवे नोड परिसरात घडत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत उलवे मधील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी दिली.




नवी मुंबई नजदिक असलेल्या उलवे परिसरात बाहेरून आलेले उच्चशिक्षित व गर्भ श्रिमंत व्यक्ती मोठया प्रमाणात राहण्यास आलेले आहेत. या शिक्षित व गर्भश्रीमंत व्यक्तींच्या घरात व त्यांचे काही विधी असल्यास विधी करणाऱ्या काही व्यक्ति विधीसाठी नको तेवढी गुरुदक्षिणा घेत असल्याचे प्रकार घडत आहेत.उघड उघड पणे काही व्यक्ती कडुन धार्मिक विधीसाठी भाविक भक्तांना वेठीस धरण्याचे प्रकार उलवे नोड व उलवे नोड परिसरातील आजूबाजूच्या गावात सुरु आहे. धार्मिक विधिसाठी मागेल तेवढे पैसे नागरिकांकडून, भाविक भक्तांकडून मिळत असल्याने धार्मिक विधी करणारे ब्राह्मण व पंडित यांचे मोठ्या प्रमाणात उलवे परिसरात स्तोम माजले आहे. या वाढलेल्या स्तोमला आळा घालण्यासाठी उलवे येथील हॉटेल स्वाद येथे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उलवे मधील पंडितांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून उलवे नोड व उलवे नोड परिसरातील आजूबाजूच्या गावात भाविक भक्तांची कशी लुबाडणूक चालू आहे याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील व उपस्थित पंडित वर्गांनी पत्रकार परिषदेत दिली.




समाजात धार्मिक विधी महत्वाचे आहेत.मात्र विधीसाठी नको तेवढी रक्कमेची मागणी करणे चुकीचे आहे. ही एकप्रकारची, आर्थिक लूट आहे. नागरिकांची धार्मिक विधी द्वारे होणारी लूट थांबविण्यासाठी उलवे तील पंडितांनी एकत्र येत, कमी खर्चात, कमी गुरुदक्षिणेत सेवा देण्याचा निर्धार केला आहे. आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी उलवे तील आचार्य पुरोहित मंडळाचे पुजारी, पंडित सज्ज झाले आले आहेत.काही धार्मिक विधीसाठी फक्त 10 ते 15 हजार खर्च आहे तिथे 80 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकही पंडित, ब्राह्मण भेटत नाहीत म्हणून मजबुरी म्हणून जेवढे ब्राह्मण, पंडित सांगतात तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. 



उलवे परिसरात एखाद्या विधिला 10 ते 20 हजार खर्च आहे अशा ठिकाणी 40 हजार,50 हजार मागितले जातात. असा प्रकार सर्रास पणे उलवे नोड परिसरात सुरु आहे.नागरिकांनी धार्मिक विधीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे न देता कमी पैसे द्यावेत.नागरिकांनी, कमी खर्चात चांगली सेवा देणाऱ्या आचार्य पुरोहित मंडल उलवेच्या पंडिताशी संपर्क साधून उलवे नोड व उलवे नोड परिसरातील नागरिकांनी आपले धार्मिक विधी करावेत. स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून व जास्त पैसे मागणाऱ्या व्यक्तीकडून पूजा विधी धार्मिक कार्यक्रम करू नयेत.असे आवाहन उलवे मधील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आचार्य पुरोहित मंडलचे पंडित अतुल तिवारी, पंडित फनिश ओझा, पंडित लक्ष्मण देव पांडेय, पंडित रजनीकांत भार्गव,पंडित मनिष तिवारी, आचार्य पुरोहित सहयोगी मंडल उलवेचे पंडित पुवन शुक्ला, पंडित सुशील कुमार दुबे आदी पंडित यावेळी उपस्थित होते.


 यावेळी पंड़ित फणीश ओझा यांनी आचार्य पुरोहीत मंडल उलवे या संघटनेच्या माध्यमातून ईश्वराची सेवा धार्मिक विधीच्या माध्यमातून सुरु असून नागरिकांची भोळ्या भाविक भक्तांची चाललेली लूट, आर्थिक फसवणूक थांबविण्यासाठी आचार्य पुरोहित मंडल उलवेची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली सेवा देणारे ब्राह्मण पंडित वर्ग या संघटनेत आहेत. या संघटनेच्या पंडीतांशी संपर्क करूनच नागरिकांनी आपले विधी उरकावेत असे आवाहन पंडित फणीश ओझा यांनी पत्रकार परिषदेत केले.या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उलवे नोड परिसरात विविध धार्मिक विधिसाठी भाविक भक्तांची कशी आर्थिक फसवणूक, लूट सुरु आहे.हे जनतेसमोर आले आहे.विविध धार्मिक विधिसाठी येणारा खर्च, ब्राह्मण, पंडीतचे गुरुदक्षिणा, त्यांची फी, त्यांचा मोबदला यांचे दर निश्चित करण्याची मागणी उलवे नोड व परिसरातील नागरिकांनी केली आहे.



थोडे नवीन जरा जुने