डोंगरी ग्रामसुधारणा मंडळावर शिवसेना प्रणित पॅनलचे वर्चस्व

 शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेवशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविले यश


 उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील डोंगरी गावात गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व गावाच्या परंपरेनुसार ग्रामसुधारणा मंडळाची व पदाधिकारी यांची निवड केली जाते, यावेळी सुद्धा गुढीपाडव्या च्या दिवशी बुधवार दिनाकं 22 मार्च 2023 रोजी मावळते अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि कायदेशीर ग्रामपंचायत ऑफिसच्या बाहेर कामगार नेते आणि शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुधारणा मंडळ डोंगरीची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली, यामध्ये अध्यक्ष पदी रुपेश प्रदीप घरत,उपाध्यक्ष पदी कल्पेश उमेश ठाकूर, सचिव पदी परेश अंकुश पाटील आणि खजिनदार पदी हरेश दामोदर घरत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
 
या प्रसंगी शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख व कामगार नेते महादेवशेठ घरत, अनंत घरत, निलेश घरत, किरण घरत, सचिन पाटील, मनोज घरत, राजेंद्र घरत,अनिल घरत अनंत भगत, मंगेश घरत ,किशोर घरत किशोर म्हात्रे राकेश पाटील,बाबुराव पाटील याचबरोबर डोंगरी मधील 300 हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

 डोंगरी गावात महादेवशेठ घरत यांचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे या निवडीचे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )उरण विधानसभा संपर्कप्रमुख आणि कामगार नेते महादेव घरत व सर्व पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तसेच लवकरच हे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची भेट घेणार आहेत.


थोडे नवीन जरा जुने