जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची उरण- रायगड येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागत यात्रा


            




उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )
हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज -जिल्हा सेवा समिती - उत्तर रायगड यांच्यावतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. सांस्कृतिक दर्शन तसेच सामाजिक संदेश यांचा मिलाफ या मिरवणुकीत पहायला मिळाल्याने या शोभायात्रेने उरण करांचे लक्ष वेधून घेतले. या स्वागतयात्रेत सामाजिक जाणिवांची जागृती करणारे , परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपणारे चित्ररथ पनवेल, अलिबाग, उरण, पेण, खालापूर, सुधागड, कर्जत आणि रोहा आदी तालुक्यातून सहभागी झाले होते.





हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे, सर्व लोकांनी एकत्र यावे, विविधतेतील एकतेचे दर्शन व्हावे, संत परंपरेचा वारसा जपला जावा, नवीन पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड च्यावतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेची सुरुवात जगदगुरु "श्री" च्या धुपारतीने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित कोट नाका, राघोबा मंदिर-उरण मार्केट - चार रस्ता - उरण नगर परिषद शाळा न. १ आणि २ या मार्गाने संपन्न झाली. शोभायात्रेत विविध चित्ररथांचा समावेश होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग, जय मल्हार देखावा, संत जनाबाई देखावा, झाशीची राणी देखावा, धर्मक्षेत्र देखावा, ब्लड इन नीड- नाणीजधाम अंबुलन्स देखावा, भजन पथक, झांज पथक, भगवा झेंडा पथक , कलश पथक, नववर्ष गुढी पथक आणि सामाजिक जाणिवेबद्दल जागरुकता निर्माण करणा-या विविध चित्ररथांचा समावेश होता.



या स्वागत यात्रेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महेशशेठ बालदी - आमदार उरण विधानसभा, नितीन पाटील माजी नगराध्यक्ष उरण नगरपालिका,सायली म्हात्रे - माजी नगराध्यक्षा उरण नगरपालिका,जेवेंद्र कोळी, उपनगराध्यक्ष,कौशिक शहा नगरसेवक उरण नगरपालिका,राजा पडते, घारापुरी अध्यक्ष,जस्मिन गॅस - समाजसेवक उरण, अनिल खारकर जिल्हा निरीक्षक स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड, प्रमोद परदेशी जिल्हा अध्यक्ष - स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड, रमाकांत बंडा- तालुकाध्यक्ष स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड,


सुरेश पोसतांडेल -तालुका निरीक्षक स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड,बाबुराव खारपाटील -तालुका सचिव स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड,त्रिवेणी ठाकूर तालुका महिला अध्यक्ष स्वस्वरुप संप्रदाय उत्तर रायगड आदी मान्यवर उपस्थित होते.




शोभायात्रेच्या माध्यमातून ज.न.म. संस्थानाच्या माध्यामातून केल्या जाणा-या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विविध फलकांचाही शोभायात्रेत समावेश होता. या शोभायात्रेत उत्तर रायगड जिल्ह्यातून १५०० ते १७०० भाविकभक्तगण उपस्थित होते. ही शोभा यात्रा पाहण्यासाठी उरण करांनी प्रचंड गर्दी केली होती. शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा सेवा समिती - तालुका सेवा समिती - सेवाकेंद्र समितीतील सर्व पदाधिका-यांनी खुप परिश्रम घेतले.


थोडे नवीन जरा जुने