उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे ) दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी हिंदू नववर्षाचे स्वागत उरण मधील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या माध्यमातून शोभा यात्रेद्वारे करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ नागरिक मंडळ उरणच्या माध्यमातून उरण शहरात पेन्शनर्स पार्क,गणपती चौक,विमला तलाव, एन आय हायस्कूल मार्गे पेन्शनर्स पार्क असे शोभायात्रा काढून नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत पुरुषांसोबत महिला वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या .
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर विविध भारतीय वेशभूषा परिधान करून आले होते. उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था यांच्यातर्फे पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवी स्वराज्य अभिमानी वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटातील प्रथम क्रमांक किरण म्हात्रे व द्वितीय क्रमांक आर. एस.शर्मा यांना मिळाला.हिंदवी स्वराज्य रणरागिणी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रगती दळी तर द्वितीय क्रमांक केतना चौधरी यांनी पटकाविला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळ उरणचे अध्यक्ष हसमुख भिंडे , उपाध्यक्ष अरुण मोदी, सचिव उमेश नाईक, सहसचिव केतना चौधरी,माजी अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, गौरी देशपांडे, सीमा घरत, मारुती गणाचारी, चंदा मेवाती, संगीता पवार,प्रमिला म्हात्रे, संदिप देशपांडे, विशाल पाटेकर, समर्पण मेडिटेशन परिवाराचे आचार्य महेंद्र म्हात्रे, प्रमिला म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
जेष्ठ नागरिकांसाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते असे स्वर्गीय सुरेश काटदरे, विजय सुळे यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.शेवटी निरोप समारंभ व आभार प्रदर्शन झाले.या वेळी या कार्यक्रमाला बँजोची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटेकर यांचे आभार मानण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आर.एस. शर्मा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Tags
उरण