पनवेल दि. ३० (संजय कदम) : स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या आदेशाने कराड जिल्हा व कराड जिल्ह्यातील तालुका व शहरातील कार्यकारिणी निवडण्यात आली. कराड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी बापूसाहेब वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळाराम जाधव , महासचिव अशोक वाघमारे , संघटक भगवान गरुड, मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित होते. कराड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सर्व कार्यकारणीचे पदाधिकारी नेमणूक करण्यात येत आहेत. दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांचा वाढदिवस आहे . या वाढदिवसाच्या औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पक्षाध्यक्ष मनोज संसार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी महानगरपालिका नगरपालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत.
लवकरच रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे . त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष व विविध पदाधिकारी यांच्या नेमणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
Tags
पनवेल