मराठा बांधवांच्या उपस्थितीत झाले मराठा समाज संपर्क कार्यालयाचे उदघाटन
पनवेल दि. ३० ( वार्ताहर ) : मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक , न्याय हक्कासाठी व विकासासाठी लढणारी खांदा कॉलनीतील मराठा समाज बांधवांनी मराठ्यांनी मराठ्यांसाठी उभारलेली एकमेव चळवळ म्हणजेच सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी.     मराठा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, मराठा समाजासाठी असणाऱ्या शासकीय योजना यांची माहिती समाज बांधवांना देण्यासाठी व मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्यासाठी समाज बांधवांच्या सहकार्याने "मराठा समाज - संपर्क कार्यालय" ची उभारणी केली आहे. या संपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रम गुरुवार दिनांक ३० मार्च २०२३ रोजी सकाळी ११:०० वा रामनवमी च्या शुभ मुहूर्तावर खांदा कॉलनी मधील मराठा समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


 खांदाकॉलनीतील मराठा समाजाच्या या संपर्क कार्यालयातून अनेक समाज उपयोगी कार्य केले जाणार असून समाज बांधवांनी मराठा जोडो अभियान अंतर्गत सभासद नोंदणी करून घेण्याचे आवाहन सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीच्या वतीने करण्यात आले.थोडे नवीन जरा जुने