वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरातून पळून जाणाऱ्या मुलाला दिले कुटुंबियांच्या ताब्यात
पनवेल दि.१७ (संजय कदम): पनवेल जवळील मुंबई-पुणे महामार्गावरून एक मुलगा परवानगी नसतानाही त्याची मोटार सायकल घेऊन प्रवास करत होता. त्यावेळी पेट्रोलिंग करत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या तो निदर्शनास आल्याने त्याला त्यांनी ताबडतोब थांबले व महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे आणून त्याची चौकशी केली असता तो घरच्यांना न सांगता घरातून पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्याची प्रेमाने चौकशी करून त्याच्या कुटुंबीयांची माहिती घेतली व त्यांच्याशी संपर्क साधून पोलिसांनी त्यांना सदर ठिकाणी बोलवून त्या मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले.     मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर पोलीस उपनिरीक्षक बुरकुल व महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे मोबाईल वरील अंमलदार भगत, जाधव, अवतार हे नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सुझुकी एक्सेस मोटरसायकल क्रमांक MH 14 ED 0393 वरील चालक आदर्श किरण तोरकडी (रा.काव्यधारा सोसायटी, कोळशेत,ठाणे(प)) हा द्रुतगती महामार्गावर मोटरसायकला परवानगी नसताना त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन चालला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता तो न थांबता पळू लागल्याने त्यांना संशय आलं व किमी नं.7 चिखले गाव, ता.पनवेल येथे ताबडतोब थांबले आणि लायसनची व गाडीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता सदर मोटरसायकलची समर्पक माहिती देवू तो शकला नाही.


 त्यामुळे त्याला मोटरसायकल सह ताब्यात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र,पळस्पे येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याची अधिक विचारपूस करून चौकशी केली असता तो घाबरून गेल्याने आवश्यक माहिती देत नव्हता व आईवडीलांना न कळविण्याबाबत सांगत होता. त्यामुळे सदर मुलाची मानसिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामंजस्याने त्याचे कडून त्याचे वडीलांचा फोन नं. प्राप्त करून त्यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून अधिक चौकशी केली असता सदर मुलगा त्याचे आई-वडिलांना न सांगता घरातून घाबरून पळून निघून आला होता. त्याबाबत त्याने त्याच्या घरी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती व तो हरविलेला आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे वडील किरण राजाराम तोरकडी यांच्याशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर मुलाचा शोध लागण्यास मदत झाली.थोडे नवीन जरा जुने