शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह जेष्ठ नागरिकांनी केला जाहीर प्रवेश
पनवेल दि. १७ (संजय कदम): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह जेष्ठ नागरिकांनी भगवा ध्वज हाती घेत व शिव बंधन बांधून पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.


     खारघर वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह जेष्ठ नागरिक त्यामध्ये प्रामुख्याने प्रकाश भालेराव, सदाशिव मुरगुडे, ठक्कर, चतुर्वेदी, संदीप ठाकुर, यांच्या सह अनेकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला 


त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड शिरीष घरत यांच्यासह महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपमहानगर समन्वयक संजय शिंदे, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, उप शहर संघटक शंकर सोनुले, विभाग प्रमुख उत्तम मोर्बेकर, सचिन ठाकूर, अनिल तळवणेकर, विभाग संघटक संजय कानडे, उपविभाग प्रमुख परशुराम देवरुखकर, शाखा प्रमुख आनंद व्हावळ, प्रणीत ठाकुर, सुयोग ठाकुर संतोष कट्टीमणी आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने