रात्री क्लिनिक बंद करून घरी जात असताना त्यांच्या खात्यातून ९९,९९९ रुपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यामुळे त्यांनी पतीला विचारणा केली असता त्यांनी व्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला संपर्क साधून खाते बंद केले. त्यांनी घरी जाऊन पतीच्या मोबाईलची तपासणी केली असता ९९,९९९ रुपयांसंदर्भात ओटीपी; तर पैसे काढल्याचा मेसेज आल्याचे त्यांच्या लक्षात आले; तर दुसऱ्यांदा ९,९९९ रुपयांच्या व्यवहाराचा मेसेज आणि ओटीपी पतीच्या मोबाईलवर गेल्याचे निदर्शनास आले.
Tags
पनवेल