दुचाकीची चोरी


पनवेल दि. ०५ (वार्ताहर): राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे . 


                      कामोठे सेक्टर २२ मधील प्रकाश राठोड याने त्याच्या घरासमोर उभी केलेली एमएच ४६ एक्यू ४४९१ ही मोटारसायकल चोरीला गेली आहे. मोटारसायकल वाहतूक पोलिसांनी उचलून नेली असेल किंवा मित्राने गंमत केली असेल असे वाटल्याने सर्वत्र शोध घेऊनही मोटारसायकल न सापडल्याने कामोठे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.


थोडे नवीन जरा जुने