पनवेल दि. ०५ (वार्ताहर): पनवेल परिसरात मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना घडल्याने महिला वर्गांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे . यातील पहिली घटना खांदा वसाहतीत तर दुसरी घटना खारघर परिसरात घडली आहे
पहिल्या घटनेत खांदा कॉलनीत राहणाऱ्या अंजली सिंग या खांदा कॉलनीतून जात असताना स्कूटीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केले, तर दुसऱ्या घटनेत खारघर, येथे राहणाऱ्या मंदा नावडेकर सेंट्रल पार्क येथून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दुचाकीवरून पसार झाला. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Tags
पनवेल