सायली श्याम ठाकूर यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भाजप ओबीसी मोर्च्याचे प्रदेश

 


उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी केले अभिनंदन 
पनवेल दि. ०५ (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील नेरे गावातील सायली श्याम ठाकूर हिची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा २०२१ मध्ये महिलांमध्ये तृतीय क्रमांक आणि ओबीसी महिला प्रवर्गात सलग दोन वेळा प्रथम क्रमांक प्राप्त करून सायली ठाकूरची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. 


 पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील सायली ठाकूर या कन्येने अथक परिश्रम आणि मेहनतीने सर्वप्रथम उपमुख्यकार्यकारी या पदावर आणि आता उपजिल्हाधिकारी पदापर्यंत गरुडझेप घेतल्याने पनवेलकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याअंतर्गत भाजप ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सायली ठाकूर हिची भेट घेऊन तिला मिळालेल्या या यश बद्दल तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे नेते अजय कांडपिळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  थोडे नवीन जरा जुने