युवासेना राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच ठिकाणी एकाच दिवशी युवासेना युनिट्स चे उद्घाटन
पनवेल दि. ०५ (वार्ताहर): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने युवासेना राष्ट्रीय कोअर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी सरस्वती महाविद्यालय खारघर सोबत पाच महाविद्यालयांच्या युवासेना युनिट्स चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भारती विद्यापीठ खारघर, KLE महाविद्यालय कळंबोली, एमजीएम कामोठे, एसी पाटील महाविद्यालय खारघर ह्या महाविद्यालयावर युवासेना युनिट ची स्थापना करण्यात आली.                    विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत, विद्यापीठातील समस्या अशा अनेक समस्या सोडविण्याचे कार्य ह्या युनिट्स च्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याचे यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यांनी सांगितले. ह्या युनिट स्थापनेवेळी युवासेना कॉलेज कक्षामधून ओंकार चव्हाण, उपमहानगर प्रमुख रोशन पवार, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, शहर प्रमुख प्रसाद परब, उपशहर प्रमुख शैलेश शिंदे यांच्यासह युवासेना आणि शिवसैनिक उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने