रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट, रुधिरसेतू व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल दि ३( संजय कदम): सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून पनवेल मध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट, रुधिरसेतू व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


               
             रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट, रुधिरसेतू व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने आज पूज्य सिंधी पंचायत हॉल विश्राळी नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला समाजातील विविध स्तरातील लोकांनी उपस्थिती लावून रक्तदान केले. या शिबिराबद्दल बोलताना हनुमंत साखरे व ऍड. मनोहर सचदेव यांनी सांगितले की कोरोनाच्या कालावधी मध्ये अनेकजणांना रक्ताची गरज होती त्यावेळी अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून कित्येकांचे जीव वाचविले आहेत.


 आगामी काळात सुद्धा रक्ताची कमतरता भासू नये या उद्धेशानेच आम्ही आज या शिबिराचे आयोजन केले आहे. व याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने निश्चितच शंभरीचा आकडा पार करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आगामी काळात सुद्धा अशाप्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍड. मनोहर सचदेव यांनी दिले. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना जेष्ठ पत्रकार संजय कदम व पत्रकार हरेश साठे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. थोडे नवीन जरा जुने