स्वामीआबानंदगिरीजी महाराज यांच दुःखद निधन







प. पू. महायोगी गगनगिरी महाराजांचे परमशिष्य श्री श्री १००८ प. पू. महामंडलेश्वर स्वामीआबानंदगिरीजी महाराज यांच दुःखद निधन
श्री श्री १००८ प. पू. महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज , श्री पंच दशनाम जुना आखाडा*, यांना आज रोजी दि. ०३/०३/२०२३ सायं. ०७.२५ वा. वयाच्या 69 व्या वर्षी गुरुआज्ञा झाली आहे. ते सिबिडी बेलापूर येथे अपोलो रुग्णालयात गेली 15 दिवस दाखल होते.


आबानंदगिरी महाराज यांनी अनाथ वृद्धासांठी परमशांती धाम वृद्धाश्रमांची स्थापना करून या मार्फत आजवर हजारो निराधार वृद्धाचा विनामूल्य सांभाळ करत आहेत व सातारा परिसरात आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मोफत १० वी पर्यंतचे शिक्षण ही करत आहेत. महाराज मानवतेचे पुजारी होते. राष्ट्र संत गाडगे बाबांच्या कार्याचा वसा घेउन व गुरुवर्य महायोगी गगनगिरी महाराजांच्या कृपा आशिर्वादाने, मानवता हाच खरा धर्म मानून ते आपले जीवन जगत होते.
ते *प.पु. महायोगी गगनगिरी महाराजांचे परमशिष्य होते.


आखाडा परंपरे नुसार महाराजांचा समाधी सोहळा रविवार दि. ०५/०३/२०२३ रोजी दुपारी ०४.०० वा श्रीगुरु महंत हरिगिरीजी महाराज, महामंत्री आखाडा परिषदयांच्या उपस्थितीमध्ये *शिवदत्त मठ, कापसेवाडी, पोष्ट - सरताळे, तालुका - जावली, जिल्हा - सातारा* येथे करण्यात येणार आहे.



सर्व भक्तांना विनंती आहे की सर्वांनी *शिवदत्त मठ, कापसेवाडी, पोष्ट - सरताळे, तालुका - जावली, जिल्हा - सातारा* या ठिकाणीच अंतिम दर्शन होईल.


थोडे नवीन जरा जुने