महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांचे संप सुरूच.






संपाचा दुसरा दिवस. तरीही मागण्या अमान्यच
उरण. दि 15 (विठ्ठल ममताबादे) नगर परिषद, नगरपंचायती मध्ये काम करणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे अनेक विविध मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठविला आहे.कायदेशीर व शांततेच्या मार्गाने शासनाशी पत्रव्यवहार सुद्धा केला मात्र अधिकारी कर्मचा-यांच्या मागण्या,समस्या सुटत नसल्याने दि.14 मार्च 2023 पासून सदर संघटनेचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी यांनी उरण नगर परिषद कार्यालय समोरच बसून आपला संप सुरु केला




.संपाचा आज दिनांक 15 मार्च रोजी दुसरा दिवस आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्याने अधिकारी कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.संपूर्ण कामकाज बंद करून यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वर्ग या संपात सहभागी झाले होते.





महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना चे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाघमारे, कार्याध्यक्ष विश्वनाथ घुगे,प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप रावणकर, प्रदेश सरचिणीस सुरेश पोसतांडेल, प्रदेश कोषाध्यक्ष अनिल पवार, संघटक केशव कानपुडे,दिपकजी रोडे , धर्माजी खिल्लारे, अभिजीत गोरे, किरण आहेर, माधव पाटील आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका,नगर परिषद, नगरपंचायत मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी या बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभाग घेतला



.उरण मध्ये उरण नगर परिषद कार्यालयासमोर सुरु असलेल्या संपात उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव,संतोष गुडेकर,सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहजिनदार रमेश सरवदे , कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष- नितिन कांबरे, संघटक - अनिल जगधनी,झुंबर माने,महिला संघटक-सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनिषा उमटे,भारती कारंगुटकर , रशिदा शेख, कांचन तारेकर,सल्लागार- धनंजय थोरात, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, सचिन भानुसे, जयराम पाटील, संतोष कांबळे , विजय पवार, संजय परदेशी, धनेश कासारे,अनिल कासारे यांच्यासह - उरण नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उरण तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद आदी विविध शासकीय कार्यालयात संप पाळण्यात आला. सर्वच अधिकारी कर्मचारी या संपात उतरले असल्याने जुन्या पेन्शनचा व इतर मागण्यांचा मुद्दा चिघळत चालला आहे.



थोडे नवीन जरा जुने