महाराष्ट्र राज्य तायक्वाँडो स्पर्धेत कु.वेद विलास मोरे याने सुवर्ण पदक मिळवून "राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड"
पनवेल दि.२२ (वार्ताहर) : ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब- ज्युनियर तायक्वाँडो स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कु.वेद विलास मोरे याने सुवर्ण पदक पटकाविले. वेद हा सध्या नवीन पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके विद्यालयातून इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
चिपळूण सावर्डे येथील श्री.विठ्ठलराव जोशी धर्मादाय ट्रस्ट क्रीडा संकुलात आयोजित करणात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ६७२ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग घेतलेल्या रायगड जिल्हा तायक्वाँडो असोसिएशनच्या कु.वेद विलास मोरे ने पुण्याच्या श्लोक कामठे चे आव्हान मोडीत सुवर्ण पदक पटकाविले. वेद ने पहिल्या फेरीत वेद कालंबे (पालघर) २४-४ पराभव केला, दुसऱ्या फेरीत अभत खाडेकर (औरंगाबाद) १४-५ उपात्य फेरीत मलीक पठाण (सोलापूर) याचा १५ - ३ असा पराभव करून आपल्या वेगवान खेळाने कु. वेद मोरे ने अंतिम फेरीत पुण्याच्या श्लोक कामठेचा १८- ७ असा पराभव करीत
.सुवर्णपदकावर हक्क सांगितला. वेद याची येत्या २४ ते २८ मार्च २०२३ दरम्यान जे एन इनडोअर स्टेडियम कटक ओडीसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रायगड प्रमुख शिक्षक सुभाष पाटील, सहाय्यक प्रशिक्षक संतोष पालेकर, तसेच तेजस माळी, मच्छिंद्र मुंडे, राकेश जाधव, अक्षता भगत, सोनु वडगीर, इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.
Tags
पनवेल