पनवेल दि.२२ (वार्ताहर) : हुबळी एक्स्प्रेसने पुणे येथे बहिणीकडे जात असताना इसमाच्या खिशातील १४,५०० रुपयांचा मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
नेरूळ सेक्टर २ मध्ये राहणारा पलाश किटके हा हुबळी एक्स्प्रेसने पुणे येथे बहिणीकडे जात असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील १४,५०० रुपयांचा मोबाइल चोरून नेला. याबाबत गावावरून परत आल्यानंतर पलाश याने पनवेल रेल्वे पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान प्रवासात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्याने प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
Tags
पनवेल