पनवेल दि १० (वार्ताहर) : एका टेम्पोमधून १२ म्हशींसह ३ रेडक्यांची वाहतूक करणाऱ्यांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सायन-पनवेल महामार्गावरून आयशर टेम्पोमधून १२ म्हशी व ३ रेडके दाटीवाटीने भरून घेऊन जात असल्याची माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर टेम्पो ताब्यात घेऊन पाहणी केली असता संबंधित टेम्पोचालकाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही व जनावरांची योग्य काळजी घेतली नव्हती. यामुळे खारघर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल