पनवेल दि १० (वार्ताहर) : अवैधपणे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केल्याची घटना तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
तळोजा मधील खुटारी गावाजवळ रस्त्यावर अवैधपणे खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या दोन फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गॅस शेगडीचा वापर करून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला असून, तळोजा सह पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विविध ठिकाणी अशा प्रकारची कारवाई सुरु केली आहे.
Tags
पनवेल