पनवेल दि.२४ (संजय कदम) : लघुशंकाकरिता मोटारसायकवरून उतरून फोनवर बोलणाऱ्या इसमाचा त्रिकुटाने मोबाईल खेचून पसार झाल्याची घटना चिंचपाडा ब्रिज ते मोठा खांदा गाव दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर घडली आहे.
स्नेहल घरत हा आपला मित्रासोबत करंजाडे येथुन मोटरसायकलवरून खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जात होता. चिंचपाडा ब्रिज ते मोठा खांदा गाव दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मोटरसायकल थांबवुन लघुशंकाकरिता उतरल्यानंतर तो आपल्या सँमसंग एस २१ मोबाईल फोनवर तो बोलत असताना चिंचपाडा ब्रिजकडुन नंबरप्लेट नसलेल्या काळया व लाल रंगाच्या डीओ मोटर सायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांपैकी मोटरसायकलवर सर्वात पाठीमागे बसलेल्या इसमाने स्नेहलच्या हातातील मोबाईल फोन जबरीने खेचून ते तिघेही आरोपी पसार झाले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
पनवेल