पायी जाणाऱ्या महिलेला भूलथापा देऊन दागिने नेले लुबाडू







पनवेल दि.२४ (वार्ताहर) : बतावणी करून तसेच भूलथापा मारून ज्येष्ठ नागरिक व महिलांना लुबाडणाऱ्या दोघा भामट्यांनी कामोठेत राहणाऱ्या एका ६७ वर्षीय वृद्धेजवळचे १ लाख रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.



सुजाता मोरे या पायी चालत कामोठे से- ३४ मध्ये राहणाऱ्या मुलाच्या घरी जात होत्या. यावेळी कामोठे ब्रिज ते मानसरोवर रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पदपथावरून जात असताना, एका भामट्याने त्यांना अडवले व आपले साहेब गरीब महिलांना मोफत वस्तू वाटत असल्याचे सांगून सोबत येण्यास सांगितले. मोरे यांनी त्याला नकार दिल्यानंतरही भामट्याने त्यांना जबरदस्तीने सोबत नेऊन भुरसार बिल्डिंगच्या खाली पायरीवर नेऊन बसवले.



 तसेच त्यांच्या हातात एक कापडी पिशवी दिली. काही वेळातच त्याठिकाणी आणखी एक भामटा आल्यानंतर दोघांनी मोरे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील बांगड्या काढून त्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने काढून घेतल्या. त्यानंतर रिकामी पिशवी त्यांच्याकडे देऊन त्याच ठिकाणी त्यांना बसण्यास सांगितले. तसेच थोड्या वेळात साहेब येतील व त्यांना वस्तू देतील असे सांगून पलायन केले. काही वेळानंतर मोरे यांनी पिशवी तपासली असता, त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.



थोडे नवीन जरा जुने