कामोठे येथे नाल्याजवळ आढळला मृतदेह

पनवेल दि.२४ (वार्ताहर) : कामोठे वसाहतीमध्ये विस्टा कॉर्नर जवळील नाल्या शेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. 


  कामोठे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सेक्टर २१ येथील विस्टा कॉर्नर जवळील नाल्या शेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. कामोठे पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कामोठे शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने