स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांचा करण्यात आला सत्कार




पनवेल दि.२४ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांचा पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) चे मठाधिपती सुधाकर भाऊ घरत यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला. 



               यावेळी श्री स्वामी मठाचे प्रकाश घरत व स्वामीसेवक उपस्थित होते. त्याचप्रमाणे दैनिक रायगड नगरी या वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त संपादक राकेश पितळे व ज्येष्ठ पत्रकार अरविंद पोतदार यांनी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पनवेल व उरण तालुका बुरुड समाजाच्या वतीने वैश्य समाज हॉल येथे सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेला महेश साळुंखे यांनी भेट दिली. यावेळी महेश साळुंखे यांचे विकास गायकवाड यांनी स्वागत केले.

थोडे नवीन जरा जुने